Wednesday, July 12, 2017

ती राहून गेलेली

"ती.. राहून गेलेली..."

ती माझी म्हणता म्हणता..कधी हातातून;
पाऱ्या सारखी निसटली कळलंच नाही,
डोळे उघडले तेव्हा उमगलं..
माझं म्हणावं असं काही उरलंच नाही!

तिच्या जाण्याने खरंतर मी कोलमडलो होतो..
"या नश्वर देहाचा त्यागच करावा";
कितीदा तरी बडबडलो होतो!

नंतर वाटलं असं करून..
काहीच मिळणार नाही;
माझ्या वेदनांची सल..
तिला कधीच कळणार नाही!

ठरवलं स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं..
प्रेमाच्या किचकट वाटेवर..
यापुढे चुकून हि नाही यायचं!

आणि असंच केलं हो मी..रुचत न्हवत तरीही!

काळ बदलत होता दिवस ढळत होता..
जीवनाचा क्लिस्ट प्रवास मरण्यासाठी तळमळत होता;

एक दिवस एका अनोळख्या ठिकाणी..
ती पुन्हा ओळखीच्या सारखी भेटली;
का कळे कुणास ठाऊक पाहून तिला..
मनात अचानक हुरहूर दाटली!

ती माझ्या जवळ आली म्हणाली "माफ कर मला..
तुला सोडून जाण्याचा मोठा गुन्हा मी रे केला"

मी स्तब्ध काय करावं कळतंच न्हवतं..
मी स्वप्नात कि सत्यात हेच खरंतर वळत नव्हतं!

ती आली होती हो माझ्या डोळ्यातले अश्रू पुसायला..
पण तिला आता कोण सांगणार..
डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी..
.
.
.
.
मी जिवंत नको का असायला!

- शशांक कोंडविलकर


No comments:

Post a Comment