Friday, April 28, 2017

दुनियेची रीत


कित्येकदा खाली पडलो..
कुणीच उचलण्यासाठी आलं नाही;
थोडंसं उडण्याचा काय प्रयत्न केला..
जराही पाडणा-यांची कमी झाली नाही.
- शशांक कोंडविलकर

Wednesday, April 26, 2017

याला जीवन ऐसे नाव

"याला जीवन ऐसे नाव"

पाण्याचा एक 'थेंब' जर 'वातीवर' पडला;
तर 'दिवा' ही निट जळत नाही,
मनाला 'संशयाचा' गंध चढला;
तर 'जीवन' काय हेच कळत नाही...

करार 'सावलीचा' जेव्हा..
होतो रखरखत्या 'उन्हाशी';
पाझरणा-या 'डोळ्यांचा'..
मग खेळ भाबड्या 'मनाशी',

'ओळखीची' सोबत..
मिळते अनोळख्या 'वळणाशी';
'पाऊलवाट' गुरफटताना..
तक्रारीचा संभ्रम 'वा-याशी',

खरंच 'नियतीचं' गणित..
कधी 'सांधता' येत नाही;
जीवन म्हणजे 'उत्तरच' हो..
पण 'प्रश्न' मांडता येत नाही,

पाण्याचा एक 'थेंब' जर 'वातीवर' पडला;
तर 'दिवा' ही निट जळत नाही,
मनाला 'संशयाचा' गंध चढला;
तर 'जीवन' काय हेच कळत नाही.

- शशांक कोंडविलकर


Monday, April 24, 2017

सहज सुचलेलं


"सहजचं सुचलेलं"

हलकं - फुलकंच असतं आयुष्य..
ओझं तर अपेक्षांच असतं;
बंद मुठीत जन्माचं सार..
उघड्या हाती सुखांत वसतं.

- शशांक कोंडविलकर

Friday, April 21, 2017

निःशब्दातला भावगर्भ

काही न बोलता आज तीने..
फक्त हातावर हात ठेवला होता;
खरंच कळलं हो न बोलता ही..
भावना अगदी सहज उमजून येतात;
तसा प्रत्येकालाच आज काल..
स्वतःसाठी space हवा असतो;
पण आपुलकीचा base पुरेपूर असला..
तर 'निशब्दातले भावगर्भ' ही;
सारं काही बोलून जातात.
- शशांक कोंडविलकर



Wednesday, April 19, 2017

मन की बात


"मन की बात.."
आज सहजच विचारलं तीला.. 👦
"कोणत्याही गोष्टीने पाघळत नाही तू;
इतकं 'कठीण मन' कुठे गं करुन मिळतं.."
तशीच गुश्श्यातच  म्हणाली ती; 👱
"माझ्या मनाचं राहूदे.. आधी मला सांग!
'मलाच पडलेलं तुझ्याबद्दलचं हे Question'
तुलाच कसं काय रे छळतं!"
🤔😏🙄



Monday, April 17, 2017

लेपण


"लेपण"

खरं म्हटलं तर इथे प्रत्येकानेच..
आपआपल्या पद्धतीने वापर केला 'मनाचा';
आणि मन उगाचच समजायचं..
लोकांच्या पसंतीला उतरलो आपण,
आता वाटतं 'बेजबाबदारपणाच'..
अगदी बरा होता;
कारण जबाबदारीने वागल्यावर..
अपेक्षांच अनाठाई असतं 'लेपण'.

- शशांक कोंडविलकर


Saturday, April 15, 2017

प्राक्तन

#प्राक्तन.. #प्रारब्ध.. #destiny.. #predestination

देव जाणे कुठले गुन्हे झाले हातून..
की 'आकांक्षाच्या' वयात 'अनुभवचं' ठोस मिळाले
अनुभवांतून प्रगल्भ झाली दुःखाची मिमंसा..
आणि 'नवीन दुःखच' जून्या दुःखांवरचे 'डोस' कळाले

- शशांक कोंडविलकर

Wednesday, April 12, 2017

अंतिम सत्य

'अंतिम सत्य'

खरं सांग काय मिळवलं इथं,
जे हरवण्याची भिती बाळगतो रे 'जीवा'..
तू गेल्यावर दोन आसवं गाळेलं ही 'दुनिया'
आणि फायद्यासाठी शोधेल पुन्हा नवाकोरा 'दुवा'

- शशांक कोंडविलकर

Monday, April 10, 2017

आयुष्य

#आयुष्य.. #life.. #lifespan #जीवन

आयुष्य ही किती विचित्र म्हणायचं..
हसू लागलो की लोकं जळतात,
आणि शांत राहण्याचा प्रयत्न केला..
तर संशयाच्या माना वळतात.
 - शशांक कोंडविलकर


Saturday, April 8, 2017

प्रेम

"प्रेम..."

'प्रेम' असं करावं.. की भले;
ते 'प्रेम' आपल्याला मिळालं नाही तरी,
समोरच्याला जेव्हा 'ते' मिळेल..
तेव्हा आपल्या 'प्रेमाची' आठवण..
त्याला 'प्रेमाने' आली पाहिजे.


- शशांक कोंडविलकर


Thursday, April 6, 2017

बालिश

"#बालिश"
#immature #childish #infantile #puerile

माझ्या आतल्या बालमनाला..
मी नेहमीच 'जिवंत' ठेवण्यात धन्यता मानतो;
कारण जास्तीचा 'समजूतदारपणा'..
जगण्यामध्ये निरसपणा आणतो.

- शशांक कोंडविलकर

Tuesday, April 4, 2017

व्यथा दुःखाची

"व्यथा दुःखाची"

माणसांच्या या गर्दीमध्ये..
फक्त याच गोष्टीचं रडणं आहे,
'दुःख' स्वतःचं असेल तर 'मार्मिक'..
आणि इतरांचं मात्र 'खेळणं' आहे.


- शशांक कोंडविलकर


Saturday, April 1, 2017

नशीबाचं पान


"नशीबाचं पान"

जग थोडं अजबच म्हणायचं..
अपयशाची निंदा करतं..
पण यशावर मनापासून जळतं;
मात्र घामाच्या शाईने..
जे आकांक्षांना लिहू पाहतात..
त्यांच्या नशीबाचं पान..
नक्कीच 'कोरेपणा' टाळतं.

- शशांक कोंडविलकर