Monday, February 27, 2017

"शोकांतिका"

तीची आसवं बेभान होऊन कोसळली..
माझ्या सरणावर 'मला' जागवण्यासाठी,
पण खरंतर मरणाला कारणच नव्हतं..
जर ती 'आसवं' ओघळली असती,
माझी 'आयुष्यभर' साथ निभावण्यासाठी.

- शशांक कोंडविलकर


Saturday, February 25, 2017

आकांक्षा आणि सुख

"आकांक्षा आणि सुख"

"सारा झगड़ा ही ख़्वाहिशों का है.. ना गम चाहिए ना कम चाहिए !!!"

असं म्हणतात आकांक्षाना अंतच नसतो.. आपल्याला कितीही मिळालं तरी
'थोडं अजून' आपलं चालूच असतं भले त्यासाठी काहीही करायला लागल तरी चालतं..

एक किस्सा सांगतो.. एका गडगंज श्रीमंताला म्हणे सुखंच लाभत नव्हतं..
काय करावं कळतच नव्हत त्याला.. बरेच उपाय केले पण गुण काही येत नव्हता..
शेवटी तो एका मानसोपचारतज्ञाकडे गेला..
मानसोपचाराने त्याचे पुर्ण म्हणणे ऐकले आणि त्याला सांगितलं..
" अहो तुमची समस्या अगदी साधी आहे यावर तर आमच्याकडे येणा-या
कामवाल्या बाई देखील तुम्हाला उपाय सांगू शकतील..."
असं ऐकल्यावर त्या श्रीमंताचा ego हर्ट झाला.." doctor तुम्हाला कळतं का..
ती काम वाली बाई माझा problem काय सोडवणार.. तीची लायकी काय
माझं status काय.. तुम्हाला जमत नसेल तर सोडून द्या.."
असं बोलून तो निघणार ईतक्यात doctor ने त्या माणसाला थांबवलं.. आणि म्हणाला
" साहेब माफ करा माझ्या बोलण्याने तुम्हाला त्रास झाला असेल तर I am sorry but
मला तुम्हाला हेच पटवून द्यायचं होतं.. की  तुमच्या सुखात आड येणारी गोष्ट आहे
ती म्हणजे 'Ego' आपण आपल्या आकांक्षा ईतक्या वाढवून ठेवलेल्या असतात
जीवनाकडून की आपण कधी समोरच्याचा निट विचारच करत नाही..
आपल्याला ना कधी दुःख हवं असतं ना सुख कमी हवं असतं..
शेवटी सुख काय आणि दुःख काय दोन्ही गोष्टी मानण्यावरच अवलंबून असतात..
अहो आमच्या कडे कामाला येणा-या विधवा बाईंचा 22 वर्षाचा मुलगा
रेल्वे अपघातात गेला.. सांगा काय करावं त्या माऊलीनं.. त्या ही काही काल
खचून गेल्या होत्या.. पण त्यांना उभारी दिली.. एका मांजराच्या पिल्लांनं..
आश्चर्य वाटलं ना.. पण खरं आहे ते.. ऐन पावसाच्या काळात एक मांजराचं पिल्लू
त्यांच्या दारात कुडकुडत आलं.. त्याची दया येवून त्यांनी त्या पिल्लाला घरात घेतलं..
त्याला दुध प्यायला दिलं.. थोड्या वेळाने ते पिल्लू तरतरीत झालं...
त्या माऊलीला कळलं एवढ्याश्या गोष्टीनं  या पिल्लाला आपण आनंद देवू शकतो
आणि आपल्या चेह-यावर समाधान मिळवू शकतो.. तर काय हरकत आहे
दुस-यासाठी जगण्यास... मला वाटतं तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय ते.."
doctor ने बोलणं संपवलं आणि त्या श्रीमंत माणसाकडे पाहिले तर त्याचे डोळे
पाणावलेले होते.. त्याची चुक त्याला कळली होती..

मित्र हो कदाचित हा किस्सा तुमच्या वाचनात आला ही असेल पण
आता वेळ आहे ती आचरणात आणायची..

"आकांक्षाना परोपकाराचे कोंदण लावले तर समाधानाचे सुख
सदैव चेह-यावर खुलत राहील..
आपण काय हो आज आहोत आणि उद्या नाही;
पण सत्कृतीचा दरवळ आपल्यानंतरही दिगंतात वाहील!"

- शशांक कोंडविलकर





Friday, February 24, 2017

क्षण जिंकण्याचा

"क्षण जिंकण्याचा"

आज प्रत्येकाला यश हवंय.. success हवाय पण यश सहजासहजी मिळत का?
कधी कधी तर आपण यशाच्या  जवळ आलेले असतो आणि कंटाळून पुन्हा मागे वळतो..
आणि यश हुकत.. तेव्हा खूप वाईट वाटत.. पण आपलं इप्सित साध्य करायचं असेल तर
हार मानून चालत नाही.. कारण मिळालेली संधी पुन्हा लवकर मिळत नाही...

माझा एक मित्र आहे 'समीर' नावाचा.. खूप हुशार पण परिस्थिती मुळे लाचार झालेला..
त्याला एक चांगला डॉक्टर व्हायचं होत.. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न देखील केले
पण पैशाच्या अभावी पुढचं शिक्षण जमलं नाही.. नंतर नंतर तर त्याचा
स्वतःवरचा आत्मविश्वासच गळून पडला ..अगदीच काही नाही म्हणून त्याने
एका लोकल  डॉक्टरच्या हाताखाली प्रॅक्टिस सुरु केली.. सुरुवातीचा अनुभव
खुपच वाईट होता.. डॉक्टरची बोलणी.. पेशंट च्या तक्रारी त्याने तो हैराण
झाला.. शेवटी त्याने गावी जाऊन पडेल ते काम करण्याचा विचार केला...

गावी गेल्यावर त्याला कळलं गावच राहणीमान एवढं सोप्प नाही.. सगळ्याच
गोष्टींची वाणवा आहे.. साध्या साध्या उपचारासाठी लोकांना कोसो मैल जावं
लागतं.. गावी साधा दवाखाना नाही.. त्याने विचार केला आपण जर क्लिनिक टाकलं
तर आपल्याला पैसे पण मिळतील नाही सेवा पण घडेल.. आणि डॉक्टर बनायचं
स्वप्न पूर्ण होईल..

सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी त्याला खूप
प्रयत्न करावे लागले.. पण आता त्याला हरायच नव्हतं.. जेव्हा जेव्हा त्याच्या मनात
नाउमेदीचा विचार यायचा तेव्हा तो हाच विचार करायचा
"आपण कुठल्या कारणासाठी आता पर्यंत ठाम राहिलो.." आणि त्याला
नव्याने मार्ग मिळायचा.. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेकांचा विश्वास
संपादन केला..

आज तो गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखला जातो..
आज त्याच्यामुळे गावात एक सर्वसोयींयुक्त प्रशस्त दवाखाना आहे..
लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती निर्माण झाली आहे.

'समीर' सारखी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत असतात..
आणि आपल्याला एक positive enargy देत असतात..

तसं तर आपल्या आयुष्यात अनेक खाचखळगे येतात... पण जेव्हा हरण्याची वेळ येते
तेव्हा आपण 'अजून ही कोणत्या गोष्टी साठी मागे हटलो नाही हे आठवावं..'
आत्मविश्वास वाढून एक नवी उमेद निर्माण होते..

" प्रत्येक क्षण हा जिंकण्याचा नसतो..
कधी कधी नवं काही शिकण्याचा ही असतो."

- शशांक कोंडविलकर







Sunday, February 19, 2017

"तू तूच असतोच मी मीच असते"

"तू तूच असतोच मी मीच असते"

तीच त्याच नातं नेहमीच वेगळं असत..
कधी हृदयाच्या खोलवर कधी वरवरकच दिसत..
त्याच्या नेहमीच्या वागण्याला तिचा तक्रार रुपी स्वर असतो..
तो हि थोडा हट्टखोर नेहमीच तसा वागत असतो.
"तो तोच असतो आणि ती तिच असते"

- शशांक कोंडविलकर




Thursday, February 16, 2017

परिभाषा

"परिभाषा"

कस जगायचं कस वागायचं कुणी सांगेल का मला
माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला
खरंच प्रत्येकाला हिरो बनायचंय पण कस ते मात्र
काळात नाही
या जाग्याची नक्की परिभाषा कोणती हे कळलं की सगळंच सोप्प आहे...
पण ते शोधन म्हणजे अग्निदिव्य च म्हणावं लागेल.😊

- शशांक कोंडविलकर

Wednesday, February 15, 2017

आठवण जर आली माझी ...

 आठवण जर आली माझी ...



प्रेमाच्या सप्ताहात आठवण  कशी विसरून चालेल ...

प्रत्येक वेळी त्याचीच बाजू का समजून घ्यायची

कधीतरी तिलाही समजून घेतलं गेलं पाहिजे ना....










Tuesday, February 14, 2017

" खरं valentine "

खरं valentine "

कालच.. व्हॅलेन्टाईन डे  साजरा झाला..जगजाहीर
'सो कॉल्ड प्रेमाचा दिवस..'
पण  खरंच प्रेमाचा असा काही दिवस असतो का..
खरं तर प्रेम म्हणजे काय हे उलगडण्याची गरज आहे
तेव्हाच कळेल " खरं valentine "

- शशांक कोंडविलकर


Monday, February 13, 2017

'प्रेमाचा सहवास

'प्रेमाचा सहवास'

आज प्रेमाचा दिवस.. पण खरं तर प्रेमाचा असा काही दिवसाचं नसतो
पण प्रेमाचा सहवास हा नेहमीच हवाहवासा वाटतो..
माझा हा 'प्रेमाचा सहवास'
तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
- शशांक कोंडविलकर

https://www.youtube.com/watch?v=gZf0TYXnCbs&feature=youtu.be











Sunday, February 12, 2017

" माझ्यातला मी "
प्रत्येकाचा एक जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन असतो..
बरं त्यातही मतांतरे असतातच..
हा  दृष्टीकोन काहींना रुचतो तर काहींना खटकतो..
पण या सगळ्यात आपल्या मनाला काय वाटत हे महत्वाचं...
आता खरंतर प्रत्येकानी " माझ्यातला मी " शोधण्याची 
गरज आहे.. मी प्रयत्न केलाय तुम्ही हि करून बघा 
- शशांक कोंडविलकर 



Saturday, February 11, 2017

"तुझी चाहूल"

"तुझी चाहूल"

प्रेमात पडल्यावर सारंच काही छान वाटतं
पिकलं पान हि हिरवागार रान वाटतं
मोहरत्या स्पर्शानं अख्ख देहभान पेटत
पाघळलेल्या मनाला जणू  सौख्यच दान भेटत..
प्रेमात पडल्यावर सारंच काही छान वाटतं!!!

- शशांक कोंडविलकर


Friday, February 10, 2017

"दोन घडीचा डाव"

"दोन घडीचा डाव"

तसं म्हटलं तर आयुष्य हे दोन घडीचंच..
उद्या काय होणार ह्याचा कुणालाच ठाव नाही ..
तरीही आपण मोहात गुरफटतो.. आणि अमिशाच्या
मागे आयुष्यभर भरकटत राहतो..
मृत्यू अबाधीत सत्य आहे हे माहित असून हि ..
त्याची तमा न बाळगता त्यालाच आव्हान देण्याचा
प्रयत्न करतो.. पण हे चांगलं नाही..

खरं तर "या दोन घडीच्या डावाला आपल्या सत्कर्मानी
सांधायला हवं... मरणा नंतर हि आपलं नाव समाजात
गुण्यागोविंद्याने नांदायला हवं!"

- शशांक कोंडविलकर

Thursday, February 9, 2017

"क्षण जगण्याचे"

"क्षण जगण्याचे" 

आयुष्यातला प्रत्येक क्षण वेचताना खूप सांभाळून वागावं लागत,
दुनियेच्या दृष्टीकोनात इमोशन ला थोडं खुंटीवर टांगाव लागत.

- शशांक कोंडविलकर

Wednesday, February 8, 2017

"स्वभाव"

"स्वभाव" 

असं म्हणतात स्वभावाला इलाज नसतो..
आपण कितीही काही करा..
दोष हा नेहमी आपलाच असतो..
जास्त पण मनावर घेऊन  काहीच फायदा नाही..
नाहीतर रोष आपल्यावरच ओढवतो.

- शशांक कोंडविलकर



Tuesday, February 7, 2017

"चौकट.."

"चौकट.."

आपण प्रत्येक जण एका चौकटीत जगत असतो..
हेच काम मी करू शकतो हे मला जमणार नाही..
वैगेरे.. पण खरंच असत का!..
थोडं विचार करण्याची नक्कीच गरज आहे..
आणि थोडी गरज आहे "चौकट" विस्तारण्याची!

- शशांक कोंडविलकर 

Monday, February 6, 2017

'लिखाणातली गर्भितता'

'लिखाणातली गर्भितता'

तोडकं मोडकं लिहीत असतो..
मनामधलं मांडीत असतो
उद्देश असा काहीच नसतो
लिहिताना मात्र तुझा चेहराच दिसतो.
इतकं सार करून सुद्धा तुला मात्र काहीच कळत नाही
'लिखाणातली गर्भितता' तुझ्याशी काही जुळत नाही ...

- शशांक कोंडविलकर

Sunday, February 5, 2017

गुज मनीचे..





आपण बऱ्याचदा लोकांचं ऐकतो पण आपलं मन हि आपल्याला काहीतरी सांगत असतं..
किंवा त्याला काही सांगायचं असतं ...अशा या मानाचं गुज.... गुज मनीचे!


- शशांक कोंडविलकर

Friday, February 3, 2017

आठवणीतली तू

आठवणीतली तू 

माहित आहेत मला तुझ्या सर्व खाणाखुणा
हृदयात प्रेम आहे पण चेहऱ्यावर तिरस्कार जुना..

तू तुझ्या लांब सडक केसांनी, मला बांधू पाहायचीस..
आणि नाही जमलं म्हणून त्याची घट्ट वेणी बांधायचीस,
माझ्या साठी तुही कधी रात्र रात्र जागायचीस..
मला बघता क्षणी कधी डोळ्यांनी तर कधी ओठांनी लाजायचीस,

माझ्या एका नजरेसाठी तू खिडकीत उभी रहायचीस..
कधी बहाणा करून बाल्कनीत कपडे वाळत घालायचीस,
माझ्यासाठी  तू  उघड्या डोळ्यांनी तळमळायचीस..
दुसरी कुणी जवळ आली तर मनापासून  जळायचीस,

खरं सांगू मनापासून तू हि मला आवडायचीस..
पण नशीबपुढे तशी कुणाची गाडी चालायची,

आशा आहे आता तरी समजशील तू माझ्या भावना
सरण आद्य उताऱ्यावरच्या ह्या शेवटच्या पाऊल खुणा..
माहित आहेत मला तुझ्या सर्व खाणाखुणा..
हृदयात प्रेम आहे पण चेहऱ्यावर तिरस्कार जुना!

-Shashank kondvilkar