Sunday, December 27, 2015

माहीत आहे मला


माहीत आहे मला;
माझ्या वाचून तुझं तसं काहीच अडणार नाही..
पण माझ्या मनात नक्की काय आहे;
हे देखील तुला कधीच कळणार नाही..
आज मला टाळतेस..अगदी ञयस्थासारखी;
पण 'एक दिवस' माझ्याशिवाय..
तुला दुसरं काहीच स्मरणार नाही..

माहीत आहे मला;
माझ्या वाचून तुझं तसं काहीच अडणार नाही..

येशील सारं विसरुन नव्याने मला सावराया;
पण तेव्हा माञ मला तसं काहीच सलणार नाही.
कारण निपचीत पडलेल्या माझ्या देहाची;
सरणावर होत असेल फक्त लाही लाही..
फक्त लाही लाही....!

- शशांक कोंडविलकर

Saturday, December 19, 2015

#तुझं वागणं #your #behavior

https://m.facebook.com/829711563768315/photos/np.1450584942767928.100001630651840/979091752163628/?type=3


असे तुझे रागावणे,
फार जिव्हारी लागते..
सारं काही जाणून ही तू ,
 का अशी गं वागते..

जाणली आहेत मी ही,
तुझ्या रुसण्याची कारणे..
वेळ नाही देत म्हणूनी,
उगाच आसु गाळणे..
प्रतारणा नाही माझी,
देवू किती उदाहरणे..
जगण्याच्या त्या धडपडीतली,
केविळवाणी प्रसारणे..

प्रत्येकवेळी माझ्याच खरेपणाची,
तू पोचपावती मागते...

असे तुझे रागावणे,
फार जिव्हारी लागते..
सारं काही जाणून ही तू ,
 का अशी गं वागते..

- शशांक कोंडविलकर