Monday, August 14, 2017

देशभक्ती डॉट कॉम

"#देशभक्ती डॉट कॉम"

आज आपल्या देशाचा '७१ वा स्वातंञ्य दिन..'
प्रत्येकाच्या मनात.. देश प्रेम अगदी ओथंबून वाहणार...
जागोजागी ध्वजारोहण.. स्वातंञ्याचं celebration बघायला मिळणार..
शुभ्र कपडे छातीवर देशाचा बिल्ला
नगरेत फुकटची आणलेली ऐट.. झालं आपण देशभक्त
म्हणायला मोकळे.. खरंय ना!

आज देशभक्तीपर गाण्याचा ढोल गल्ली ते दिल्ली
सगळीकडे वाजत राहणार..
कपडयांपासून गाडया.. कार्यालये,
शाळांमध्ये प्रतिकात्मक ध्वजांचे लेबल लावले जाणार..
पण खरंच 'देशभक्ती' आपल्या अंतर्मनात
उतरली आहे का?...

१४ ऑगस्ट पासून देशप्रेमाचा आलेला Overflow
हा १५ ऑगस्ट च्या रात्रीपर्यंत ओसरलेला असतो..
आणि दुस-या दिवशी दिसतं ते देशप्रेमाचं..
"भग्न वास्तव"..!

मला सांगा १५ ऑगस्टला अगदी अभिमानाने मिरवणारे
देशाचे symbol दुस-या दिवशी निखळून पडलेले असतात..
हिच का आपली देशभक्ती!
आणि नुसतं ध्वजाचे प्रतिक लावलं म्हणजे
आपलं देशप्रेम.. असं तर होतं नाही ना!

आज आपण या दिवसाचं Celebration करतोय..
पण खरंच आपण स्वतंत्र झालोय का..!
अजून ही गरीबी .. जातीभेद..
आणि एकंदर समाजव्यवस्था बदललेली आहे का?

मुलभूत गरजांमध्ये 'भुकेला' पहिलं प्राधान्य!
पण ते ही पुर्ण होताना जीवाची कायली होते..
मग कसलं स्वातंञ्य!

प्रगती झाली नाही असं आपण म्हणू शकतं नाही..
जगाच्या नकाशावर आपण अगदी सन्मानाने मिरवतोय..
पण देशातल्या 'चुली' अजून 'विस्तवापासून' वंचित आहेत..
आणि हे वास्तव आपण नाकारता कामा नये!

हे अगदी जळजळीत 'सत्य' आपण आपल्या
उघडया डोळ्यांनी बघतोय.. बेकारी उपासमार
दारिद्रय.. विच्छिन्न होवून ऊकिरड्यावरच्या
उष्टानासारखं उग्र दर्पाने भगभगतय आणि आपण..
आपण १ जीबीचा नेटपॕक एक तास आधी संपला
म्हणून शोक करतोय..

हे मोबाईलच खेळणं तरुणाईच्या हातात आलंय खरं
पण या इंटरनेटच्या जाळ्यानं तरुणाईचच खेळणं झालंय..
माणसामाणसातलं बोलणं बंद झालं आणि
विचारांचं मंथन चॅटिंगवर फिटींग झालंय..
अरे  हे काय चाललयं..!

रोज नवनवीन भ्रष्टाचाराचे कारनामे..
बलात्कार.. विनयभंग.. जातीचं राजकारण..
समाजवादात दडपलेला व्याभिचार..
सगळं कसं सुरळीत चालू आहे!

हो.. यासाठी आपण दोष देतोय एकमेकांना
पण स्वतःला कधीच दोषी ठरवण्यास तयार
नाही आहोत आपण..
का तर 'मुलगी जन्माला यावी.. पण दुस-याच्या घरात'
अशी संकोचित वृती झालेय आपली!

आज देशाच्या स्वातंत्र्याला ७१ वर्षे होवून
सुद्धा विचाराने अजून ही आपण..
'मागासलेल्या मानसिकतेतच' अडकलेलो आहोत.
हे योग्य आहे का?

एरवी घरातच भावबंधकीत वाटले गेलेलो आपण
कशाला देशएकजूटीच्या आरोळ्या देतोय!
वर्षभर कुळ-जात-धर्म-प्रांत यात विभागून
धन्यता मानणारे आपल्या सारखे लोक
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनादिवशी
अगदी स्वातंत्र्य सैनिक असल्याचा आव आणतो
देशप्रेमाचा पूर येतो अगदी (दिखाव्यापुरता) मनामनात!

आपल्या प्रगतीला अडथळा निर्माण होतो!
याला सर्वस्वी जबाबदार आपणच!
कारण आपण "सुज्ञ देशाचे सुज्ञ नागरीक ना..!"

दगडाच्या देवाला मनोभावे पुजणारे आपण
जीवंत जीवाला धुडकारण्यात श्रेष्ठत्व मानतो..
आयुष्यभर जीवापाड जपणा-या 'आपल्या माणसांना'
वृध्दापकाळात वृध्दाश्रमाची वाट दाखवतो..आपणचं ना!

आपण आपल्या 'माणसांचे' नाही झालो तर
'देशाचे' तरी काय होणार..!

देशाबद्दल अभिमान असावाच पण तो कृतीतून दिसावा...
आणि हे सगळं घडण्यासाठी सुरुवात ही आपणच करायला हवी..!

आज काल सामाजिक कार्यात स्वतःला
Highlight करुन घेण्यात अनेकांचा 'स्वार्थ' आहे.
पण "भुकेल्या जीवाला घास आणि अपेक्षितांची आस"
आपण जर बनू शकलो.. तर 'स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरीक'
म्हणवून घ्यायला अर्थ आहे..

"जातीच्या आरक्षणापेक्षा जातीलाच नष्ट करण्यासाठी
का एकत्र येत नाही आपण!"
एक देश आणि एकच जात "भारतीय" असं केलं
तर कधीच आरक्षणाची गरज भासणार नाही..
आणि 'जातीच्या राजकारणाची पोळी'
या राजकारण्यांची कधीच भाजणार नाही!

So याचा विचार करण्यास काहीच हरकत नाही.
थोडसं परखड पण अगदी 'मनापासूनच'
हे माझं मत आहे..!

अर्थातच 'अभिव्यक्ती स्वातंञ्यामुळे' मी हे सगळं मांडू शकलो
आणि या 'स्वातंञ्यांसाठी' देशाला सलाम...!

तरी ही अजून ही 'ख-या स्वातंञ्याच्या' प्रतिक्षेत मन व्याकुळ आहे..
आणि ते लवकरात लवकर प्राप्त होईल हीच मनस्वी आस!

सर्वांना अपेक्षित " स्वातंञ्य दिनाच्या " हार्दिक शुभेच्छा!

- शशांक कोंडविलकर

🙏💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐🙏

Tuesday, July 25, 2017

अनुभव प्रेमाचा

#अनुभवप्रेमाचा!
#experienceoflove

हल्ली माझ्याकडून..
प्रेमाचे सल्ले मागतात लोकं;
तुझ्याबरोबरच 'प्रेम'..
इतकं अनुभव देवून गेलं,
मौनाची 'परिभाषा'..
तुला कधीच कळली नाही;
आणि 'प्रेमाच्या' नावावर..
सगळ्यांनी मला 'बदनाम' केलं!

- शशांक कोंडविलकर
(आपल्या शाब्दीक अभिप्रायाची अपेक्षा)

Wednesday, July 19, 2017

पावसाला एवढंच सांगायचंय

आता येणा-या पावसाच्या प्रत्येक थेंबाला..
एवढं आर्जवून सांगायचंय;
भिजलो होतो आपण दोघे अगदी चिंब..
आज पुन्हा त्या क्षणांना.. अगदी निवांत मागायचंय!

माहीत नाही आता याला.. तू कशी react होशील..
ईच्छा नसली तरी माझ्यासाठी.. पण नक्कीच तू येशील;

"किती हा वेडेपणा.." म्हणशीलच मग तू..
वेंधळ्या सरीच्या ओलेत्या क्षणाचा.. पण आवडेल तुला ऋतू!
तुझ्याचसाठी आता तुझ्याशी.. शहाण्यासारखं वागायचंय.
आज पुन्हा त्या क्षणांना.. अगदी निवांत मागायचंय!

Monday, July 17, 2017

त्याच तीच भांडण ओल्या चिंब दिवसात


"#त्याचं #तिचं #भांडण.. #ओल्या #चिंब #दिवसात!"

बाहेर निळ्या आभाळाचं..
धरतीशी द्वंद्व चालू असतं;
घरात मात्र त्याचं तिच्याशी..
'चहा' वरुन बोलणं बंद असतं!

दिवस तसा सरुन जातो;
रात्रीचं काही ठरत नाही..
ती त्याच्याशी बोलत नाही..
आणि हा ही मनातलं खोलत नाही!

कशी बशी जेवणं आवरतात..
मग झोपायची वेळ होते..
वातावरणात गारवा असला तरी..
ती पंखा चालू करते!

गारठ्यात बिचारा कुडकुडतो तो..
अशात अर्धी मध्यरात्र सरते,
नेहमीच्याच लुटूपुटूच्या भांडणाची..
एक वेगळी त-हा ठरते!

शेवटी त्याचा राग मग फेर धरतो..
तडक जावून तो पंखा बंद करतो;
पुरुषावर शेवटी भारीच बाई..
या विषयावर अखेर पडदाच  सारतो!

ती पुन्हा पंखा चालू करते..
झोपी गेलेल्या भांडणावर नव्याने लाली चढते;
त्याचं तिचं भांडण पाहून;
पावसाची सर ही क्षणभर विरते!

आता काय होणार या भितीनं..
गारव्याला ही चांगली धडकी भरते!
अहो इथंच मोठी गंमत होते..
दिवसभराचं भांडण विसरुन;
ती अलगद त्याच्या कुशीत शिरते!

पुढंच काही विचारु नका..
'आणि पुढे काय घडते!'
पावसाळ्यात रात्रीच्या अंधारात म्हणे..
घट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते.
घट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते!

- शशांक कोंडविलकर

Wednesday, July 12, 2017

ती राहून गेलेली

"ती.. राहून गेलेली..."

ती माझी म्हणता म्हणता..कधी हातातून;
पाऱ्या सारखी निसटली कळलंच नाही,
डोळे उघडले तेव्हा उमगलं..
माझं म्हणावं असं काही उरलंच नाही!

तिच्या जाण्याने खरंतर मी कोलमडलो होतो..
"या नश्वर देहाचा त्यागच करावा";
कितीदा तरी बडबडलो होतो!

नंतर वाटलं असं करून..
काहीच मिळणार नाही;
माझ्या वेदनांची सल..
तिला कधीच कळणार नाही!

ठरवलं स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं..
प्रेमाच्या किचकट वाटेवर..
यापुढे चुकून हि नाही यायचं!

आणि असंच केलं हो मी..रुचत न्हवत तरीही!

काळ बदलत होता दिवस ढळत होता..
जीवनाचा क्लिस्ट प्रवास मरण्यासाठी तळमळत होता;

एक दिवस एका अनोळख्या ठिकाणी..
ती पुन्हा ओळखीच्या सारखी भेटली;
का कळे कुणास ठाऊक पाहून तिला..
मनात अचानक हुरहूर दाटली!

ती माझ्या जवळ आली म्हणाली "माफ कर मला..
तुला सोडून जाण्याचा मोठा गुन्हा मी रे केला"

मी स्तब्ध काय करावं कळतंच न्हवतं..
मी स्वप्नात कि सत्यात हेच खरंतर वळत नव्हतं!

ती आली होती हो माझ्या डोळ्यातले अश्रू पुसायला..
पण तिला आता कोण सांगणार..
डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी..
.
.
.
.
मी जिवंत नको का असायला!

- शशांक कोंडविलकर


Tuesday, July 4, 2017

कळलं का!

तिला काहीच 'कळलं' नाही..
हे नेहमीच मला कळलेलं असतं;
पण तिच्या कळण्याच्या 'कलाने' घेणं..
हे कधीच मला टळलेलं नसतं!

- शशांक कोंडविलकर

Monday, June 26, 2017

ती मी आणि पाऊस


#ती #मी आणि #पाऊस

पावसाचं आणि माझं..
तसं कधीच पटत नाही;
पाऊस आवडत नाही मला..
म्हणून ती ही मला भेटत नाही.

खरं सांगू मी तिला खूप आवडतो
उगाच overconfidence रेटत नाही
पण पावसासकट आवडावी ती
मनात हे काही एकवटत नाही..

पाऊस आवडत नाही मला..
म्हणून ती ही मला भेटत नाही.

तीच्या माझ्या भांडणामध्ये
पाऊस एकमेव दुआ असतो
मला वाटतो अगदी कंटाळवाणा
पण तिला मात्र तो हवा असतो
उघड्या माळराणी सोडा
अगदी गर्दीत ही ती मला
कधीच येवून खेटत नाही..

पाऊस आवडत नाही मला..
म्हणून ती ही मला भेटत नाही.

त्या दिवशी अगदी विचित्र झालं..
आम्हा दोघांच्या एकांतामध्ये
नेमकं आभाळ भरुन आलं

झालं आता काय चान्स हुकला
ती मस्त भिजेल पावसात
आणि आपला होणार कोप-यातला ठोकळा

अहो पण ईथेच थोडी गम्मत झाली
विज कडाडली आभाळात
आणि ती चक्क माझ्या मिठीत आली..

काय म्हणता पुढे काय झालं?..
अहं हे मात्र.. आता सांगता येत नाही
पण पाऊस अगदीच वाईट असतो
आता हा वाद पेटत नाही

पावसाशिवाय जगणं बुआ
आपल्याला काही पटत नाही!
पावसामधल्या मिठीसारखं
दुसरं सुख वाटत नाही.

@शशांक कोंडविलकर
#skshashank

(व्हिडीओ ऐकताना कृपया handsfree/ earphone वर ऐकावा..
आणि हो कविता आणि विडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय द्यावा)
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸