Tuesday, July 25, 2017

अनुभव प्रेमाचा

#अनुभवप्रेमाचा!
#experienceoflove

हल्ली माझ्याकडून..
प्रेमाचे सल्ले मागतात लोकं;
तुझ्याबरोबरच 'प्रेम'..
इतकं अनुभव देवून गेलं,
मौनाची 'परिभाषा'..
तुला कधीच कळली नाही;
आणि 'प्रेमाच्या' नावावर..
सगळ्यांनी मला 'बदनाम' केलं!

- शशांक कोंडविलकर
(आपल्या शाब्दीक अभिप्रायाची अपेक्षा)

Wednesday, July 19, 2017

पावसाला एवढंच सांगायचंय

आता येणा-या पावसाच्या प्रत्येक थेंबाला..
एवढं आर्जवून सांगायचंय;
भिजलो होतो आपण दोघे अगदी चिंब..
आज पुन्हा त्या क्षणांना.. अगदी निवांत मागायचंय!

माहीत नाही आता याला.. तू कशी react होशील..
ईच्छा नसली तरी माझ्यासाठी.. पण नक्कीच तू येशील;

"किती हा वेडेपणा.." म्हणशीलच मग तू..
वेंधळ्या सरीच्या ओलेत्या क्षणाचा.. पण आवडेल तुला ऋतू!
तुझ्याचसाठी आता तुझ्याशी.. शहाण्यासारखं वागायचंय.
आज पुन्हा त्या क्षणांना.. अगदी निवांत मागायचंय!

Monday, July 17, 2017

त्याच तीच भांडण ओल्या चिंब दिवसात


"#त्याचं #तिचं #भांडण.. #ओल्या #चिंब #दिवसात!"

बाहेर निळ्या आभाळाचं..
धरतीशी द्वंद्व चालू असतं;
घरात मात्र त्याचं तिच्याशी..
'चहा' वरुन बोलणं बंद असतं!

दिवस तसा सरुन जातो;
रात्रीचं काही ठरत नाही..
ती त्याच्याशी बोलत नाही..
आणि हा ही मनातलं खोलत नाही!

कशी बशी जेवणं आवरतात..
मग झोपायची वेळ होते..
वातावरणात गारवा असला तरी..
ती पंखा चालू करते!

गारठ्यात बिचारा कुडकुडतो तो..
अशात अर्धी मध्यरात्र सरते,
नेहमीच्याच लुटूपुटूच्या भांडणाची..
एक वेगळी त-हा ठरते!

शेवटी त्याचा राग मग फेर धरतो..
तडक जावून तो पंखा बंद करतो;
पुरुषावर शेवटी भारीच बाई..
या विषयावर अखेर पडदाच  सारतो!

ती पुन्हा पंखा चालू करते..
झोपी गेलेल्या भांडणावर नव्याने लाली चढते;
त्याचं तिचं भांडण पाहून;
पावसाची सर ही क्षणभर विरते!

आता काय होणार या भितीनं..
गारव्याला ही चांगली धडकी भरते!
अहो इथंच मोठी गंमत होते..
दिवसभराचं भांडण विसरुन;
ती अलगद त्याच्या कुशीत शिरते!

पुढंच काही विचारु नका..
'आणि पुढे काय घडते!'
पावसाळ्यात रात्रीच्या अंधारात म्हणे..
घट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते.
घट्ट मिठीत प्रेम नव्याने फुलते!

- शशांक कोंडविलकर

Wednesday, July 12, 2017

ती राहून गेलेली

"ती.. राहून गेलेली..."

ती माझी म्हणता म्हणता..कधी हातातून;
पाऱ्या सारखी निसटली कळलंच नाही,
डोळे उघडले तेव्हा उमगलं..
माझं म्हणावं असं काही उरलंच नाही!

तिच्या जाण्याने खरंतर मी कोलमडलो होतो..
"या नश्वर देहाचा त्यागच करावा";
कितीदा तरी बडबडलो होतो!

नंतर वाटलं असं करून..
काहीच मिळणार नाही;
माझ्या वेदनांची सल..
तिला कधीच कळणार नाही!

ठरवलं स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं..
प्रेमाच्या किचकट वाटेवर..
यापुढे चुकून हि नाही यायचं!

आणि असंच केलं हो मी..रुचत न्हवत तरीही!

काळ बदलत होता दिवस ढळत होता..
जीवनाचा क्लिस्ट प्रवास मरण्यासाठी तळमळत होता;

एक दिवस एका अनोळख्या ठिकाणी..
ती पुन्हा ओळखीच्या सारखी भेटली;
का कळे कुणास ठाऊक पाहून तिला..
मनात अचानक हुरहूर दाटली!

ती माझ्या जवळ आली म्हणाली "माफ कर मला..
तुला सोडून जाण्याचा मोठा गुन्हा मी रे केला"

मी स्तब्ध काय करावं कळतंच न्हवतं..
मी स्वप्नात कि सत्यात हेच खरंतर वळत नव्हतं!

ती आली होती हो माझ्या डोळ्यातले अश्रू पुसायला..
पण तिला आता कोण सांगणार..
डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी..
.
.
.
.
मी जिवंत नको का असायला!

- शशांक कोंडविलकर


Tuesday, July 4, 2017

कळलं का!

तिला काहीच 'कळलं' नाही..
हे नेहमीच मला कळलेलं असतं;
पण तिच्या कळण्याच्या 'कलाने' घेणं..
हे कधीच मला टळलेलं नसतं!

- शशांक कोंडविलकर