Monday, June 26, 2017

ती मी आणि पाऊस


#ती #मी आणि #पाऊस

पावसाचं आणि माझं..
तसं कधीच पटत नाही;
पाऊस आवडत नाही मला..
म्हणून ती ही मला भेटत नाही.

खरं सांगू मी तिला खूप आवडतो
उगाच overconfidence रेटत नाही
पण पावसासकट आवडावी ती
मनात हे काही एकवटत नाही..

पाऊस आवडत नाही मला..
म्हणून ती ही मला भेटत नाही.

तीच्या माझ्या भांडणामध्ये
पाऊस एकमेव दुआ असतो
मला वाटतो अगदी कंटाळवाणा
पण तिला मात्र तो हवा असतो
उघड्या माळराणी सोडा
अगदी गर्दीत ही ती मला
कधीच येवून खेटत नाही..

पाऊस आवडत नाही मला..
म्हणून ती ही मला भेटत नाही.

त्या दिवशी अगदी विचित्र झालं..
आम्हा दोघांच्या एकांतामध्ये
नेमकं आभाळ भरुन आलं

झालं आता काय चान्स हुकला
ती मस्त भिजेल पावसात
आणि आपला होणार कोप-यातला ठोकळा

अहो पण ईथेच थोडी गम्मत झाली
विज कडाडली आभाळात
आणि ती चक्क माझ्या मिठीत आली..

काय म्हणता पुढे काय झालं?..
अहं हे मात्र.. आता सांगता येत नाही
पण पाऊस अगदीच वाईट असतो
आता हा वाद पेटत नाही

पावसाशिवाय जगणं बुआ
आपल्याला काही पटत नाही!
पावसामधल्या मिठीसारखं
दुसरं सुख वाटत नाही.

@शशांक कोंडविलकर
#skshashank

(व्हिडीओ ऐकताना कृपया handsfree/ earphone वर ऐकावा..
आणि हो कविता आणि विडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय द्यावा)
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

No comments:

Post a Comment