Saturday, February 25, 2017

आकांक्षा आणि सुख

"आकांक्षा आणि सुख"

"सारा झगड़ा ही ख़्वाहिशों का है.. ना गम चाहिए ना कम चाहिए !!!"

असं म्हणतात आकांक्षाना अंतच नसतो.. आपल्याला कितीही मिळालं तरी
'थोडं अजून' आपलं चालूच असतं भले त्यासाठी काहीही करायला लागल तरी चालतं..

एक किस्सा सांगतो.. एका गडगंज श्रीमंताला म्हणे सुखंच लाभत नव्हतं..
काय करावं कळतच नव्हत त्याला.. बरेच उपाय केले पण गुण काही येत नव्हता..
शेवटी तो एका मानसोपचारतज्ञाकडे गेला..
मानसोपचाराने त्याचे पुर्ण म्हणणे ऐकले आणि त्याला सांगितलं..
" अहो तुमची समस्या अगदी साधी आहे यावर तर आमच्याकडे येणा-या
कामवाल्या बाई देखील तुम्हाला उपाय सांगू शकतील..."
असं ऐकल्यावर त्या श्रीमंताचा ego हर्ट झाला.." doctor तुम्हाला कळतं का..
ती काम वाली बाई माझा problem काय सोडवणार.. तीची लायकी काय
माझं status काय.. तुम्हाला जमत नसेल तर सोडून द्या.."
असं बोलून तो निघणार ईतक्यात doctor ने त्या माणसाला थांबवलं.. आणि म्हणाला
" साहेब माफ करा माझ्या बोलण्याने तुम्हाला त्रास झाला असेल तर I am sorry but
मला तुम्हाला हेच पटवून द्यायचं होतं.. की  तुमच्या सुखात आड येणारी गोष्ट आहे
ती म्हणजे 'Ego' आपण आपल्या आकांक्षा ईतक्या वाढवून ठेवलेल्या असतात
जीवनाकडून की आपण कधी समोरच्याचा निट विचारच करत नाही..
आपल्याला ना कधी दुःख हवं असतं ना सुख कमी हवं असतं..
शेवटी सुख काय आणि दुःख काय दोन्ही गोष्टी मानण्यावरच अवलंबून असतात..
अहो आमच्या कडे कामाला येणा-या विधवा बाईंचा 22 वर्षाचा मुलगा
रेल्वे अपघातात गेला.. सांगा काय करावं त्या माऊलीनं.. त्या ही काही काल
खचून गेल्या होत्या.. पण त्यांना उभारी दिली.. एका मांजराच्या पिल्लांनं..
आश्चर्य वाटलं ना.. पण खरं आहे ते.. ऐन पावसाच्या काळात एक मांजराचं पिल्लू
त्यांच्या दारात कुडकुडत आलं.. त्याची दया येवून त्यांनी त्या पिल्लाला घरात घेतलं..
त्याला दुध प्यायला दिलं.. थोड्या वेळाने ते पिल्लू तरतरीत झालं...
त्या माऊलीला कळलं एवढ्याश्या गोष्टीनं  या पिल्लाला आपण आनंद देवू शकतो
आणि आपल्या चेह-यावर समाधान मिळवू शकतो.. तर काय हरकत आहे
दुस-यासाठी जगण्यास... मला वाटतं तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय ते.."
doctor ने बोलणं संपवलं आणि त्या श्रीमंत माणसाकडे पाहिले तर त्याचे डोळे
पाणावलेले होते.. त्याची चुक त्याला कळली होती..

मित्र हो कदाचित हा किस्सा तुमच्या वाचनात आला ही असेल पण
आता वेळ आहे ती आचरणात आणायची..

"आकांक्षाना परोपकाराचे कोंदण लावले तर समाधानाचे सुख
सदैव चेह-यावर खुलत राहील..
आपण काय हो आज आहोत आणि उद्या नाही;
पण सत्कृतीचा दरवळ आपल्यानंतरही दिगंतात वाहील!"

- शशांक कोंडविलकर





No comments:

Post a Comment